breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहराच्या विकासाला १२६ कोटी

स्थायी सभेत मान्यता

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थायी समितीची सभा नुकतीच पार पडली. या सभेत शहरातील विविध विकासकामासाठी  सुमारे १२६ कोटी ५७ लाख रुपये खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिका आयुक्तांना अंमलबजावणी प्राधिकारी म्हणून सर्व वित्तीय अधिकार देण्यास आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. निविदा मान्यतेकामी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे सर्वाधिकार देखील आयुक्तांना देण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली.

महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात बुधवारी स्थायी समितीची बैठक पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.

भोसरी येथील विद्युत दाहीनी ठेका पध्दतीने खासगी संस्थेस चालन देखभाल दुरूस्ती करीता देण्यात येणार आहे.  यासाठी ४९ लाख रुपये खर्च केले जाणार आहे तर सेक्टर क्र. २३ ते भाटनगर पर्यंत असलेल्या गुरूत्व जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीसाठी २१ लाख ७६ हजार रुपये खर्च केले जाणार आहे.

शहर झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत विठ्ठलनगर येथील प्रकल्पामधील इमारतीचे स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा आणि जलनि:सारण विषयक दुरूस्ती कामे करण्यासाठी येणा-या १ कोटी १२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.  वाहन दुरूस्ती कार्यशाळा विभागामार्फत महापालिकेच्या विविध विभागांच्या वापरात असलेल्या सर्व प्रकारच्या वाहन देखभाल दुरूस्ती करण्यासाठी तीन वर्षांकरीता ३ कोटी २१ लाख रुपये खर्च होणार आहे.   या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

शहरातील विविध ठिकाणच्या पाण्याच्या टाकीवरील आणि त्यावरील बायपास या जलक्षेत्रामध्ये दैनंदिन परिचालन करणे,  पाणीपुरवठा विषयक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये स.नं.९ नायडु करीता ७६ लाख रुपये, पिंपळे निलख गावठाण, रहाटणी स.नं.२० करीता ७३ लाख रुपये, पिंपळे सौदागर व वैदु वस्ती करीता ७६ लाख रुपये,    तर वाकड, भगवान नगर करीता ८३ लाख रुपये, पिंपळे गुरव करीता ७६ लाख रूपये, श्रीनगर करीता ८४ लाख रुपये, थेरगावं करीता ७३ लाख, दत्तनगर करीता ६१ लाख, लक्ष्मण नगर व गणेशनगर करीता ६६ लाख, सांगवी क्षेत्राकरीता ८७ लाख, दापोडी करीता ७४ लाख, बिजलीनगर आणि प्रेमलोकपार्ककरीता ८९ लाख, पिंपरी करीता १ कोटी १६ लाख, एल्प्रो परिसरासाठी ६१ लाख, रावेतसाठी ६९ लाख, काळाखडक, ताथवडे, पुनावळे करीता ८२ लाख आणि किवळे, मामुर्डी, रावेत करीता ९० लाख रूपये खर्च केले जाणार आहेत या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button