breaking-newsपिंपरी / चिंचवड

शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त अक्षर चित्र प्रदर्शन, सुप्रिया सुळेंच्या हस्ते चिंचवडमध्ये उद्घाटन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शहरातील कलाकार श्रृती गावडे हिने काढलेल्या ८० अक्षर चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रविवारी होत आहे.

रविवारी (दि. १५) रोजी सकाळी दहा वाजता चिंचवड येथील प्रा रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील कलादालनात हे प्रदर्शन भरविण्यात आले असल्याची माहिती संयोजक अंशुल क्रिएशन्सचे विजय जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी दिली.

शरद पवार यांच्या नावापुढे जी विशेषणे आदराने व अभिमानाने लावली जातात अशा अकल्पनिय, अफाट, अद्भुत, अजिंक्य, अजातशत्रू, करारी, कर्तृत्ववान, कष्टाळू, कर्मठ, कर्दनकाळ, खतरनाक, खमका, खनखणीत, खेळाडू, खेळीया, गतिमान, गहिवर, घमासान, घातक, चतुरस्त्र, चौफेर, चमत्कारिक, चळवळ, चिरतरुण, छावा, छातीठोक, छत्र, छबिदार, जिवलग, जिवंत, जिगरबाज, जिद्द, जेता, झंजावात, टोकदार, टस्सल, ठाणेदार, ठसनी, डोंगर, डरकाळी, ढाण्यावाघ, तलवार, तल्लख,तरुण, तगडा, तफडदार, थलैवा, दैदिपयमान दृष्टा, धडाकेबाज, धाक, धमक, ध्यैर्यवान, निर्णायक, निरंकार, पैलवान, पटाईत, प्रबळ, प्रेमळ पिता, फुत्कार, बेधडक, बिनधास्त, बेफिकीर, बुलंद, बाहुबली, भावूक, भारावलेला, भला, मजबूत, मेहनती, माणूस, मशाल, योगी, यत्न, यार, यातना, रांगडा, राही, राजामनाचा, ललकार, लक्षभेदी, वस्ताद, विचार, विज्ञानवादी, वैश्विक विद्यापीठ, शिकारी, शांत, शाही, संयमी, सहिष्णु, सत्कार, सदाचारी, हरफनमौला, हक्काचा, क्षत्रिय आणि ज्ञानी या ८० शब्दातून शरद पवार यांची ८० अक्षरचित्रे श्रृतीने चितारली आहेत. 

अंशुल क्रिएशन हि संस्स्था व त्याचे प्रमुख विजय जगताप हे कला व कला विषयक उपक्रम राबविण्याचे काम शहरात करतात.या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. गोरक्ष लोखंडे यांची साथ व सहकार्य त्यासाठी लाभले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button