शब्दधन काव्यमंचाचे काव्य पुरस्कार जाहीर
![Poetry Award of Shabdadhan Kavyamancha announced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/शब्द.jpg)
शब्दधन काव्यमंचतर्फे आयोजत काव्यपुरस्कार वितरण सोहळा जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येईल, अशी माहिती शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी दिली.
शहरातील कवी लेखकांना त्यांच्या लेखनाला प्रेरणा मिळावी म्हणून गेल्या वीस वर्षांपासून काव्य पुरस्कार देऊन सन्मानित करते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी हा काव्यपुरस्कार वितरण सोहळा लांबला आहे.
सन 2020 साठी निवड झालेले साहित्यिक शब्दप्रतिभा पुरस्कार- कवी ,लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यवाह, प्रसिद्ध निवेदक उद्धव कानडे यांना जाहीर झाला आहे. गझलसम्राट सुरेश भट पुरस्कार गझलकार, लेखक रघुनाथ पाटील यांना देण्यात येणार आहे. कवी अरविंद भुजबळ स्मृती पुरस्कार पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ कवी बाबू डिसोझा यांना देण्यात येणार आहे.
छावा काव्य पुरस्कार एल्गार साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी महेंद्रकुमार गायकवाड, कवी दत्तात्रय श्रीकांत गुरव, कवी शामराव सरकाळे, कवयित्री फुलवती जगताप, हास्यकवी नंदकुमार कांबळे यांना जाहीर झाला आहे.