वैवाहिक सुखापासून पतीने वंचित ठेवले, तिची पोलीस ठाण्यात धाव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/6-4.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|
लग्न झाल्यापासून आपल्याला वैवाहिक सुखापासून पतीने वंचित ठेवले. एवढेच नाही तर पतीने इतरांशी असलेल्या शारिरीक संबंधाचे फोटो आणि व्हिडिओ क्लीप आपल्याला पाठविली. तो नपुसंक असल्याची माहिती सासरच्यांनी लपवून ठेवत आपली फसवणूक केली. याप्रकरणी विवाहितेने पोलीस ठाण्यात फसवणूक व विवाहितेच्या छळाची फिर्याद दिली आहे.
याबाबत २५ वर्षीय विवाहितेने शुक्रवारी (दि. ६) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्या विरोधात विवाहितेचा छळ आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ फेब्रुवारी २०१८ ते २२ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत पिंपरी आणि वडगावशेरी, पुणे येथे घडली. पती नपुसंक असल्याची माहिती सासरकडील मंडळींनी लपवून ठेवली. लग्न झाल्यापासून आपल्याला वैवाहिक सुखापासून पतीने वंचित ठेवले. एवढेच नाही तर पतीने इतरांशी असलेल्या शारिरीक संबंधाचे फोटो आणि व्हिडिओ क्लीप आपल्याला पाठविली. तसेच सासरकडील मंडळींनी फिर्यादीला पाच लाख रुपयांची मागणी केली. लग्नात मानपान केला नाही म्हणून तिचा शाररीक व मानसिक छळ केला. तसेच नांदविण्यास नकार दिल्याने विवाहितेला तिच्या आई-वडिलांकडे सोडून दिले. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम करीत आहेत.