breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
विषारी आैषध प्राशन करुन तरुणाची वाकडमध्ये आत्महत्या
पिंपरी (पुणे) – विषारी औषध प्राशन करून एका तरुणाने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. ही घटना सोमवारी (ता.२५) सकाळी वाकड येथे उघडकीस आली.
अविनाश संभाजी पवार (वय ३५ रा. बेलठिकानगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक हरिष माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील शिवकॉलनी समोर एकजण बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या व्यक्तीस त्वरित रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मयत व्यक्तीकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली आहे. कौटुंबिक कारणातून आपण आत्महत्या करीत असल्याचे अविनाश यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.