breaking-newsपिंपरी / चिंचवड
विशालनगरमध्ये मोफत वाचनालयाचे उद्घाटन
पिंपरी, (महईन्यूज) – पिंपळे निलख प्रभाग २६ विशालनगर येथील कै. वामनराव जगताप विरंगुळा केंद्रामध्ये मोफत वाचनालयाचे उदघाटन विद्यमान नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या आरती चोंधे यांच्या हस्ते करण्यात आला.
वाचक प्रेमींना वाचनालयामध्ये विविध पुस्तके वाचनचा आनंद घेता येईल. वाचन करण्याने ज्ञानात भर पडेल. यावेळी ज्येष्ठ नागरीक संघातील ज्येष्ठ नागरीकांचा वाढदिवस नारळ, गुलाबपुष्प व पुस्तक देवून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विशाल ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रंगनाथ थोपटे, सचिव बळीराम चौधरी, शालिनी गरुड, देशपांडे, वसंत आब्रे, रोहिदास गवळी, द्वारकानाथ खरे, लक्ष्मण गोसावी तसेच परीसरातील कस्पटे वस्ती ज्येष्ठ नागरीक संघाचे सभासद उपस्थीत होते.