breaking-newsपिंपरी / चिंचवड
विविध मागण्यांसाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर दिव्यांगांचे आंदोलन
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास महापालिका भवनासमोर आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी अपंग धारकांना स्टॉल संरक्षण मिळायला हवे, असे विविध फलक हातात घेतले होते.
‘भारत माता की जय.. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही’, अशा प्रकारच्या घोषणा अपंग कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी नागरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांचा देखील आंदोलनात सहभाग होता. दुपारी बाराच्या सुमारास शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन दिले.