विवाहितेचा छळ ; सासरच्या सहाजणांवर निगडी पोलिसात गुन्हा दाखल
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – विवाहितेचा शारिरीक, मानसिक छळ करून तिच्या वडिलांकडून घेतलेले 4 लाख 63 हजार रुपये परत केले नाहीत. तसेच, विवाहितेशी अनैसर्गिक संबंध प्रस्तापित केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा बुधवारी (दि. 12) दाखल करण्यात आला आहे.
प्रफुल्ल इच्छाराम कापडे (वय 47), पद्मावती इच्छाराम कापडे (वय 75, रा. गोविंदधाम द्वारा जीजी भोळे प्राधिकरण), दिनेश इच्छाराम कापडे (वय 47, रा. पिंपरी), श्रध्दा दिनेश कापडे (वय 45), शुभांगी अतुल कापडे (वय 47), अतुल इच्छाराम कापडे (वय 51, दोघे रा. भुसावळ, जि. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहीत महिला सासरी नांदत असताना पती प्रफुल्ल याने माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. पैसे आणत नसल्याने त्याने पत्नीचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. दरम्यान, विवाहिता शिक्षण घेत असून शिक्षणाच्या नावाखाली पतीने सासरकडून 4 लाख 63 हजार 315 रुपये रक्कम घेतली. ती आजतागायत परत केली नाही. असा विवाहितेचा आरोप आहे. तसेच, पतीने 2003 ते 04 दरम्यान,पीडित विवाहितेशी अनैसर्गीक संबंध प्रस्तापित केल्याचाही आरोप तक्रारीत केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.