breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विधायक उपक्रम : कोकणातील वादळग्रस्तांना उन्नती सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात

संजय भिसे आणि कुंदाताई भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य

कोकणातील वादळग्रस्तांना गृहपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पिंपरी | लॉकडाऊनमुळे कमाईचे मार्ग बंद झालेले आणि त्यातच आता निसर्ग चक्रीवादळाने डोक्यावरील छप्परही उद्ध्वस्त केले अशा दुहेरी संकटात सापडलेल्या कोकणातील वादळ पीडितांच्या मदतीसाठी पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.या संकटकाळात सामाजिक बांधिलकी जपत उन्नती सोशल फाउंडेशनने या वादळग्रस्तांसाठी माणुसकीचा हात पुढे केला आहे. संस्थेचे संस्थापक श्री संजय भिसे आणि संस्थेच्या अध्यक्षा सौ कुंदाताई संजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनच्या वतीने पालवनी गावात पीडितांना जीवनावश्यक आणि गृहपयोगी वस्तूंचे आज दि.१ ऑगस्ट २०२० रोजी वाटप करण्यात आले आहे. (DRDO Scientist) शैलेष कुलकर्णी व बाळासाहेब काटे यांच्या हस्ते ह्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.व पालवनी गावातील लोकांकडून फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ कुंदाताई संजय भिसे यांचे आभार मानण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button