breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विधान परिषद ‘फिल्डिंग’ : माजी महापौर योगेश बहल यांच्या शिफारस पत्रावर ‘या’ आजी- माजी नगरसेवकांनी केल्या स्वाक्षरी! वाचा!

– प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बहल यांच्या समर्थनासाठी आजी-माजी ७१ नगरसेवकांच्या सहिचे पत्र 


पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

विधान परिषदेसाठी राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या जागेवर आपल्याला संधी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नगरसेवक योगेश बहल यांनी केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्या संदर्भात प्रत्यक्ष भेटून दोन पानी लेखी पत्र त्यांनी दिले. त्यात परिषदेची आमदारकी आपल्याला का मिळावी याबाबत विस्ताराने सांगितले आहे.
आपल्या पत्रात बहल म्हणतात, १९९२ पासून महापालिकेत सहा वेळा निवडूण येतो आहे. शरद पवार साहेब यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून गेली २९ वर्षे राजकारणात आहे. या काळात साहेबांच्या विचारांची एक फळी निर्माण केली. साहेब आणि अजितदादा यांनी मिळून आजवर विविध पदांवर काम कऱण्याची संधी दिली. त्यात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्ताधारी नेता, विरोधी नेता तेच तितक्याच जबाबदारीने पक्षाचे शहराध्यक्षपदी सांभाळले. सर्व जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडल्या, असे बहल यांनी निदर्शनास आणून दिले.
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकित उमेदवार राहुल नार्वेकर होते, त्यावेळी अनेक नेते, आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते पक्ष सोडून गेले. त्यावेळी काही मोजक्या निष्ठावंतांसह पक्षाचे काम केले. कै. नानासाहेब शितोळे यांच्यासह मंगला कदम, महमंद पानसरे, कै. शेषाप्पा नाटेकर, जगदिश शेट्टी, उल्हास शेट्टी, जितेंद्र ननावरे, राजेश पिल्ले आदी मोजक्या लोकांसमवेत काम सुरू ठेवले होते. त्यावेळी साहेबांनी लोकसभा निवडणुकिची उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला होता, पण घरगुती अडचणीमुळे नकार दिला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभेला पिंपरी मधून अण्णा बनसोडे यांच्या प्रचाराची पूर्ण जबाबदारी सांभाळली आणि यशस्वीरित्या पार पाडली. साहेबांनी पक्षाच्या माध्यमातून अनेकांनी मोठे केल. शहरातील लक्ष्मण जगताप, विलास लांडे, आझमभाई पानसरे, अण्णा बनसोडे यांना आमदारकी, महामंडळ अध्यक्ष अशी पदे मिळाली. लांडे, पानसरे आणि मी तसे एकवेळचे सहकारी मित्र आहोत. आता राज्य पातळीवर काम कऱण्याची संधी मिळावी, अशी मागणी बहल यांनी पत्राद्वारे केली आहे.

वाचा कोणी- कोणी स्वाक्षरी केली….
योगेश बहल यांना उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातील अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी जोरदार समर्थन दिले आहे. महापौर हनुमंत भोसले, आर.एस. कुमार, अनिता फरांदे, मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, प्रकाश रेवाळे या सर्व माजी महापौरांनी तसेच भाऊसाहेब भोईर, हनुमंत गावडे, जगदिश शेट्टी, मुरलीधर ढगे, राजाराम कापसे, अतुल शितोळे, मोरेश्वर भोंडवे,राजु मिसाळ, राहुल भोसले, जावेद शेख, श्याम लांडे, संगिता ताम्हाणे, रोहित काटे, प्रविण भालेकर, दिनकर जातीर पाटील, संतोष कोकणे, गीता मंचरकर, श्रीधर वाल्हेकर, तानाजी खाडे, गुरुबक्ष पहेलाणी, हरिष आसवाणी, निकाता कदम, संतोष कोकणे, एकनाथ मोटे, सविता साळुंखे, महंमद पानसरे अशा आजी-माजी ७१ नगरसेवकांच्या सह्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button