विधानसभेवर भगवा फडकविण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न साकार, पिंपरी युवासेनेने ज्येष्ठ सैनिकांना भरविले ‘पेढे’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/IMG-20191128-WA0005.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख हिंदु-हदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न होते. ते साकार करण्याचा वीडा उचलून राज्यातील तमाम ज्येष्ठ शिवसैनिकांनी प्रदीर्घ लढा दिला. आज बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यात त्यांना यश आल्याने हा दिवस तमाम शिवसैनिकांसाठी सुवर्णक्षण आहे. या क्षणाचा आनंद साजरा करत पिंपरी युवासेनेने पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ शिवसैनिकांना पेढे भरवून जल्लोष केला.
बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्रात शिवसेना रुजवली. शिवसैनिकांना बळ दिले. सच्चा शिवसैनिकांच्या जोरावर त्यांनी राजकीय क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठले. शिवसेनेचे बोट धरून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केलेल्या भाजपला सुध्दा बाळासाहेबांनी लहान भाऊ माणून राजकीय व्यासपीठ तयार करून दिले. आज याच भावाने पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली. आज शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाची एकजूट तयार झाल्याने राज्याच्या विधानसभेवर महाविकास आघाडीची सत्ता आली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/IMG-20191128-WA0006.jpg)
आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. हा क्षण राज्यातील प्रत्येक शिवसैनिकांसाठी अभिमानाचा आहे. शिवसेनेच्या या लढ्यात सक्रीय सहभाग घेतलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांना याचे श्रेय गेले पाहिजे. ही भावना व्यक्त करत युवा सैनिकांनी आज पिंपरीत जल्लोष केला. ज्येष्ठ सैनिकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी गटनेते राहूल कलाटे, संघटीका सुलभा उबाळे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा धर, नगरसेवक राजू बनसोडे, युवासैनिक निलेश हाके, प्रतिक्षा घुले आदी यावेळी उपस्थित होते.