breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विधानसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या 17 जणांचे अर्ज, तर विलास लांडे यांचा काढता पाय

पिंपरी, (महाईन्यूज) – आगामी विधानसभा निवडणकीसाठी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षाकडे अर्ज केले आहेत. मात्र, भोसरी मतदार संघातील दिग्गज मानले जाणारे माजी आमदार विलास लांडे यांनी तिकीटासाठी पक्षाकडे अर्ज केला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला आहे. विलास लांडे विधानसभा निवडणुकीतून मागार घेतात, की पर्याय निवडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघातून राजेंद्र गणपत जगताप, विशाल शंकर वाकडकर, भाऊसाहेब रामभाऊ भोईर, मोरेश्वर महादू भोंडवे, मयुर पांडुरंग कलाटे, विठ्ठल कृष्णाजी काटे, प्रशांत कृष्णराव शितोळे यांनी अर्ज केले आहेत. पिंपरी विधानसभा मतदार संघातून ॲड. गोरक्ष जाकाराम लोखंडे, सुलक्षणा शिलवंत-धर, राजू विश्वनाथ बनसोडे, संदीपान रामा झोंबाडे, शेखर अशोक ओव्हाळ, सुनंदा सतिश काटे, गंगा संजय धेंडे, आण्णा दादू बनसोडे यांनी अर्ज केले आहेत.

भोसरी विधानसभा मतदार संघातून दत्तात्रय कोंडिबा जगताप, दत्तात्रय बाबुराव साने, पंडीत राम गवळी यांनी अर्ज केले आहेत.  चिंचवड विधानसभेतून एकूण सात, पिंपरी विधानसभेतून आठ तर भोसरी विधानसभेतून तीन असे तिनही विधानसभा मतदार संघातून एकूण अठरा उमेदवारी अर्ज पक्ष खराळवाडी, पिंपरी येथील पक्ष कार्यालयात प्राप्त झाले आहेत. अशी माहिती पक्ष प्रवक्ते फजल शेख यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button