breaking-newsपिंपरी / चिंचवड

विद्या विनय निकेतनच्या विद्यार्थ्यांनी दिला वृक्षदिंडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपळे निलख येथील विशालनगरमधील कै. नारायणराव चोंधे शिक्षण संस्था संचलित विद्या विनय निकेतन प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी शनिवारी (दि. 6) उत्साहात पार पडली.

विद्यालयातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभुषेत विशालनगर परिसरामध्ये वृक्षदिंडी काढली. याठिकाणी राहणा-या नागरिकांना वेगवेगळ्या जातीची रोपे भेट म्हणून देण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांनी नागरिकांना दिला.

पिंपळवन संस्थेचे अविनाश दौंडकर, चंद्रकांत ववले, दुर्गसंवर्धन संस्थेचे संतोष जाधव आणि मान्यवरांना स्थायी समितीच्या सदस्या आरती चोंधे यांच्या हस्ते देशी झांडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. मुलांनी गोळा केलेले शालेय साहित्य दुर्गसंवर्धनचे संतोष जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून धनादेशाचे वितरण करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात निवृत्त वनाधिकारी प्रकाश कुकडोलकर, सामाजिक कार्यकर्ते मुकूंद डमकले, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नुतन भांबुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी मोरे, सुत्रसंचालन बालाजी जाधव यांनी केले. आभार गणेश झोडगे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button