विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, म्हणून मोफत बस पासचे वाटप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/mophat-pass2.jpeg)
पिंपरी- विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहता यावे, यासाठी पिंपरी महापालिकेच्या वतीने मोफत प्रवासासाठी बस पास दिले जाणार आहेत. शिक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणापासून शाळेपर्यंत प्रवासासाठी बस पासेस दिले जात आहेत. बसच्या मोफत सुविधेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे सोपे होणार आहे. त्यामुळे या योजनेचा जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी लाभ मिळावा, याकरिता संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी आगाराकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहेत, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सभागृह नेते एकनाथ पवार, शहर प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक शत्रुघ्न काटे, उषाताई मुंडे, कैलास बारणे, शितल शिंदे आदी उपस्थितीत होते. पालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत आणि खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना 25 टक्के रक्कम भरुन बस पास देण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टी अध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते विध्यार्थांना पास वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्या अर्ज वाटप करण्यात येत असून संबंधित शाळांनी विद्यार्थी बस पास मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
महापालिका हद्दीत निवास करणा-या विद्यार्थ्यालाच बस पास देण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे घर ते शाळा अंतर दोन किलोमीटरपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. मागील वर्षी विद्यार्थ्याची हजेरी 75 टक्के असली पाहिजे आणि तो उत्तीर्ण देखील झालेला पाहिजे. पास अर्जासोबत रहीवाशी पुरावा, लाईटबील, रेशनिंगकार्ड,आधारकार्ड, पत्ता असलेले ओळखपत्र किंवा मुख्याध्यापक यांचा पत्ता असलेला पुरावा सादर करणे आवश्यक आहे. सोबत शाळेच्या गणवेशातील दोन फोटोही जोडावे लागणार आहेत. या सर्व प्रकियेची विद्यार्थी, पालक आणि शाळांना त्याची नोंद घ्यावी, असेही आमदार जगताप यांनी म्हटले आहे.