breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विठ्ठलनगर येथे बौध्द विहार वर्धापन दिनानिमित्त अभिवादन

पिंपरी | प्रतिनिधी

२५ डिसेंबर २०२० रोजी मनुस्मृती दहन व देहूरोड बौध्द विहार वर्धापन दिनानिमित्त नगरसेवक राहुल भोसले युवा मंचच्या वतीने विठ्ठलनगर पुनर्वसन येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तारामती जोगदंड व सुनिता पाटोळे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण कण्यात आले. बुध्दवंदना व सुत्तपठण घेण्यात आले. या वेळी किशोर गवळी यांनी मनुस्मृती दहन व देहूरोड बौध्दविहाराविषयी मनोगतातून माहिती दिली. शिवशंकर उबाळे यांनीही मनोगतातून अभिवादन केले.

कार्यक्रमाचे संयोजन ज्ञानोबा धावारे, अशोक देवकर, संजय जाधव, तिम्मा टाकळे, विनोद गायकवाड, शाम धोत्रे, संतोष खुडे, मिरा वाघमारे यांनी केले. या वेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button