विकासकामांसाठी स्थायी समितीची 3 कोटींच्या खर्चाला मंजुरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-11.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इ प्रभागातील विविध टाक्यांवरुन पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी येणार्या सुमारे २ कोटी २६ लाख इतक्या खर्चासह एकूण ३ कोटी १८ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मंजूरी दिली.
पालिकेच्या सीएसआर ऍक्टिव्हिटी अंतर्गत श्रृतिका बाग मुंगी यांची कॉर्पोरेट सोशल वर्कर म्हणून ६ महिने कालावधीसाठी नियुक्ती करण्यास समितीने ऐनवेळी मंजुरी दिली. त्यांना दरमहा ४० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. तसेच, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून ओमप्रकाश बहिवाल यांना दरमहा ४० हजार रुपये मानधनावर ६ महिन्यांसाठी नियुक्तीस मंजुरी देण्यात आली.
कोविड केअर सेंटर व इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईन सेंटरमधील रूग्ण व नागरिकांना प्रति व्यक्ती २५० रूपये दराने जेवण व नाश्ता देण्यात आला. त्यासाठी २५ मार्च ते १५ जून या कालावधीसाठी आलेल्या २५ लाख ४१ हजार ५४१ खर्चास कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. बैठकीत मागील वर्षातील विविध विभागाची बिले अदा करण्यास मान्यता देण्यात आली.