breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाल्याचा वाल्मिकी करण्याच्या नादात भाजपचे वस्त्रहरण – संजय राऊत

  • आमदार कदम यांच्यासारख्यांच्या बेताल वक्तव्याचा फटका
  • संघ परिवारातून आलेला भाजप बनला तत्वहीन

पिंपरी – भारतीय जनता पक्ष हा संघ संस्कृती व संघ परिवारातून निर्माण झालेला पक्ष आहे. पूर्वी भाजपकडून काही तत्वांचे पालन केले जात होते. परंतु, वाल्याचा वाल्मिकी करण्याच्या नादात राम कदमसारख्या अनेक वाल्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे भाजपचे वस्त्रहरण झाले आहे, अशा परखड शैलीत शिवसेनेचे उपनेते तथा खासदार संजय राऊत यांनी आमदार कदम यांच्यासह भाजपच्या एकुणच रणनितीचे वाभाडे काढले.

 

मावळ, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघावर 2019 मध्ये होणा-या निवडणुकींत शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये आज गुरूवारी (दि. 6) घेण्यात आली. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना राऊत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष योगेश बाबर, राज्य संघटक गोविंद घोळवे, शहर संघटक सुलभा उबाळे, मावळ जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे आदी यावेळी उपस्थित होते.

 

राऊत म्हणाले की, 2014 साली आलेल्या वावटळीमध्ये ज्या मतदार संघात आम्हाला आमचा उमेदवार निवडून आणता आला नाही. ती गफलत 2019 च्या निवडणुकीत आम्ही होऊ देणार नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेचा कसलाही परिणाम आमच्यावर होणार नाही. आम्ही कामाला सुरूवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागा आम्ही लढणार आहोत. पुढचा मुख्यमंत्री सेनेचाच असणार आहे. जरी, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका मुदतपूर्व घेण्यात आल्या. तरीही, आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. साम, दाम, दंड ही निती फक्त मुख्यमंत्री फडणवीस यांनाच जमते असे नाही. शिवसेनेने पक्षप्रमुख बाळासाहेबांच्या कार्यकाळात या नितीचा उपयोग समाजाच्या विकासासाठी केलेला आहे. कारण, या नितीचा उपयोग निवडणुका लढण्यास केला जात नाही, असे सांगत त्यांनी पालखरच्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याची चिरफाड केली.

 

भाजप आमदार राम कदमांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील संबंध महिलांचा अवमान झाला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले अशा अनेक कर्तव्यदक्ष महिलांनी समाजाला घडविण्याचे कार्य केले. अशा सर्व महिलांचा अवमान झाला आहे. राज्यातील महिला, मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. भाजपचे प्रशांत परिचारक, राम कदम यांच्या बेताल वक्तव्यामुळे महिलांची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. कदम याच्यावर केवळ कारवाई करून उपयोग नाही. भाजपला कडक भूमिका घ्यावी लागेल. अहमदनगरचा उपमहापौर छिंदम पुन्हा भाजपच्या गोटात वावरू लागला आहे, अशी माहिती समजत आहे. हे अत्यंत घातक आहे. वाल्याचा वाल्मिकी करण्याच्या नादात राम कदम, परिचारक, छिंदम यांच्यासारख्या वाल्यांच्या बेताल वक्तव्यामुळे भाजपचे वस्त्रहरण झाले आहे, असे राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button