breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएम रुग्णालयासमोर डाॅक्टरचा दारु पिऊन धिंगाणा ; कारवाईसाठी चालढकल

– वायसीएम रुग्णालय प्रशासनाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासमोर एमबीबीएस केल्यानंतर प्रशिक्षणार्थी असलेल्या एका डाॅक्टरांने दारु पिऊन धिंगाणा घातला. तसेच तेथील सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याचा प्रकार नुकताच घडला. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असून त्या संबंधित डाॅक्टरवर कारवाई न करता केवळ सक्त ताकीद देवून सोडल्याची चर्चा रुग्णालयीन कर्मचा-यामध्ये सुरु आहे. 

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने एमबीबीएस झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना शहरातील अथवा ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयात एक वर्षे प्रशिक्षण घेणे बंधनकारक केले आहे. त्यानूसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अनेक विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून वैद्यकीय सेवेचे कामकाज करीत आहेत. त्यातील एका प्रशिक्षणार्थी डाॅक्टरने मागील दोन दिवसापुर्वी अत्यावश्यक सेवा विभागासमोर पहाटे पावणे पाचच्या सुमारास दारु पिंऊन धिंगाणा घातला. तसेच तेथील सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. फोर व्हीलर गाडी चालविताना त्या डाॅक्टराने रुग्णालयासमोरचे बॅरिगेटलाही धडक दिली. परंतू, संबंधित दारु पिऊन आलेले डाॅक्टर हे ड्युटीवर नव्हते. त्यामुळे  रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या सीएमआे डाॅक्टरांनी त्या डाॅक्टराला सावरुन घेत तेथून त्याना जाण्यास सांगितले.

दरम्यान, वायसीएम रुग्णालय प्रशासनाकडून संबंधित डाॅक्टराला नोटीस न देता केवळ सक्त ताकीद दिली आहे. त्या डाॅक्टरवर कुठलीही कारवाई अद्याप केलेली नाही. सुरक्षा रक्षकांला केलेल्या धक्काबुक्कीमुळे संबंधित डाॅक्टरवर कारवाई करण्याची मागणी रुग्णालयीन कर्मचा-याकडून होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button