breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’मध्ये कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीचे शव उचलण्यासाठी स्वतंत्र स्टाफ नेमा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत पावलेल्या व्यक्तीचे शव बाहेर काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र स्टाफची नेमणूक करावी, अशी मागणी नगरसेविका सुजाता पालांडे यांनी केली आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण कोरोना आजराशी सामना करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि वायसीएम रुग्णालयातील शवागृहामध्ये कोरोनाची लागण झालेल्या डेडबॉडी हाताळणारे कर्मचारी व कोरोना आजार नसलेल्या डेडबॉडी पाठवणारे कर्मचारी एकच आहे. त्यामुळे शवागृहातील कर्मचा-यांना अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये कोरोनाग्रस्त शव हाताळणाऱ्या कर्मचा-यांचा स्वतंत्र स्टाफ उभा करावा.

BVG कर्मचा-याचा एक अतिरिक्त स्टाफ तयार करावा. पिंपरी-चिंचवड मनपा रुग्णालयात शवगृहामधील नैसर्गिक मृत्यू व कोरोना आजाराची लागण होवून मृत्यू पावलेले शव पाठविणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वेगवेगळ्या प्रकारे स्वतंत्र स्टाफ कार्यान्वित करावा, अशी मागणी नगरसेविका पालांडे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button