breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’च्या पदव्यूत्तर पदवी डाॅक्टर भरतीवरुन आरोप-प्रत्यारोप

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) पदव्यूत्तर पदवी (पीजी इन्स्टिट्यूट) विभागातील प्राध्यापक भरतीवर महापालिका सर्वसाधारण सभेत प्रश्र्न चिन्ह उपस्थित करण्यात आले. नियुक्त केलेले डाॅक्टर खाजगी प्रॅक्टीस करतात, वयोमर्यादा संपलेल्या डाॅक्टरांची भरती केली व पात्र डाॅक्टरांना डावलण्यात आले, असे आरोप करण्यात आले.

महापालिकेची आॅनलाईन सर्वसाधारण सभा बुधवारी घेण्यात आली. यावेळी महापौर उषा ढोरे पीठासन अधिकारी होत्या. वायसीएमच्या पीजी इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांची पदे भरण्यात आली. या प्रक्रियेत पात्र डाॅक्टरांना डावलण्यात आल्याने एक उमेदवाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश बहल यांनी लक्ष वेधले. त्यापूर्वी त्यांनी, ‘गद्दार गद्दार,’ म्हणत सभागृहात प्रवेश केला. त्याचा एकनाथ पवार यांनी निषेध करत वर्षांनूवर्षांची दुकानदारी बंद होवू लागल्याने काहीचा तिळपापड झाला आहे. तसेच गेल्या दहा वर्षांत झालेल्या भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

वायसीएम भरती विषयावरील चर्चेत अजित गव्हाणे, राहूल कलाटे, बाळासाहेब ओव्हाळ, आशा शेंडगे, सीमा सावळे, अभिषेक बारणे, मंगला कदम आदींनी सहभाग घेतला. . प्रशासनाच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर व सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर यांनी भूमिका मांडली. वायसीएम पीजी इन्स्टिट्यूटसाठी 74 प्राध्यापक पदे भरण्यात आली. त्यात सध्या वायसीएम सेवेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत, त्या 55 पैकी 32 जणांची निवड केली आहे, असे लोणकर यांनी सांगितले.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, राज्य सरकारच्या जाहिरातीतील अटी व शर्तीच आपण वायसीएमच्या डाॅक्टर अर्थात प्राध्यापक भरतीसाठीच्या जाहिरातीत वापरल्या. एखादी पदासाठी संबंधित उमेदवार उपलब्ध न झाल्यास निवड समिती अटी शिथिल करू शकते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button