‘वाकड’मधून भाजपला मत मागता अन्ं रस्त्यांच्या कामांना विरोध करता!
!['वाकड'मधून भाजपला मत मागता अन्ं रस्त्यांच्या कामांना विरोध करता!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Rahul-Kalate-2.jpg)
महापालिकेला वर्षाला सुमारे चारशे कोटीचा मिळतोय कर, भाजपचा विकासाला अडकाठी
पिंपरी |महाईन्यूज|
वाकड, ताथवडे परिसरातून महापालिकेला विविध कराच्या माध्यमातून सुमारे चारशे कोटीचे उत्पन्न मिळते. मात्र, त्या भागातील रस्त्यांच्या कामांना सत्ताधारी भाजप नेते व नगरसेवक विरोध करीत आहेत. विधानसभा निवडणुकीला वाकड, ताथवडे परिसरातून भाजपला मते मागायला येता. पण तेथील लोकांच्या रस्त्यांना आता विरोध करत आहेत, त्यामुळे विकास कामांना अडकाठी घालणा-या भाजप नेत्यांचा चेहरा मतदारांसमोर निश्चितपणे उघडा पडला आहे, योग्य वेळी जनता त्यांना धडा शिकवेल, अशी टिका शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेला बांधकाम परवानगी, ना हरकत दाखला, मिळकत कराव्दारे सुमारे चारशे कोटींचे उत्पन्न वाकड भागातील ज्या नागरिकांनी दिले. त्याच भागातील रस्त्यांच्या कामाना आडकाठी करण्याचे काम सत्ताधारी भाजपचे चिंचवडमधील नगरसेवक करत आहेत.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ज्या कामांवरून राडा झाला. त्यानंतर या रस्त्याबाबत सत्ताधारी भाजपची आडमुठे भूमिका असल्याचे राहूल कलाटे यांनी सांगितले. ते म्हणाले की, पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सभेत प्रभाग क्रमांक 25 ताथवडे येथील जिवननगरकडून मुंबई-बैंगलोर हायवेकडे जाणारा 24 मी. रुंद डीपी रस्ता विकसित करण्याच्या कामाची 4 कोटी 90 लाखांच्या तरतुदीतून 4 कोटी 40 लाखांचे वर्गीकरण केले. तर, प्रभाग क्रमांक 24 रस्ते क्रॉकीटीकरण करण्याच्या कामासाठीची 5 कोटींची पूर्ण तरतूत वर्ग कोरोना निधीसाठी वर्ग करण्यात आली.
स्थायीत या कामांना विरोध करणा-या नगरसेवकांनी सभेत वर्गीकरणाची उपसूचना दिली. ही बाब वाकडच्या रस्त्यांच्या कामांना आडकाठी करणारी आहे. या रस्त्यांमुळे पालिकेला आतापर्यंत बांधकाम परवानगी, ना हरकत दाखल, मिळकत कराव्दारे सुमारे चारशे कोटींचे उत्पन्न मिळवून दिले. हे पालिकेची आकडेवारी दाखवत असताना तेथील नागरिकांचेच रस्ते अडविण्याची ही भूमिका घेतली जात असल्याचा आरोप कलाटे यांनी केला.