Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
वटवृक्षाची मानवी हक्क संघटनेकडून स्वच्छता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/IMG-20180701-WA0142.jpg)
पिंपरी – पिंपळे गुरव, पिंपळे साैदागर आणि परिसरात वटसावित्री पोर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे बांधलेले सूत, पुजलेले आंबे, पुजेचे साहित्य काढले जात नाही. सध्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रोगराई पसरते, त्यामुळे वटवृक्षाला बांधलेले सूत काढून परिसर स्वच्छ करण्याचे काम मानवी हक्क व जनजागृती संघटनेने केला आहे, असे संस्थेचे अध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले.
आपल्या पत्नीलाही वटवृक्षाप्रमाणे दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून मानवी संघटनेचे पदाधिकारी पूजा करतात केली. हा उपक्रम ते गेल्या तीन वर्षापासून राबवून मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने पुरुष वटवृक्ष पौर्णिमा साजरी करतात. या भारतीय संविधानाने पती व पत्नी यांना समान हक्क दिले आहेत. आजच्या युगातील स्त्री चूल आणि मूल न राहता शेतीपासून ते नासा सारख्या संस्थेत महिला कार्यरत आहेत.
यावेळी गजानन धारशिवकर यांनी विना मोबदला टेम्पो दिवसभर या सामाजिक कार्यासाठी दिला. या उपक्रमामध्ये शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, विकास शहाणे, गजानन धारशिवकर, वसंतराव चकटे, संगीता जोगदंड, आदिती निकम, निलेश हंचाटे, आप्पाजी चव्हाण, हनुमंत पंडित, शिवानंद तालीकोटी, अरविंद मांगले, एस.डी.विभुते, सोमनाथ लखमते, ईश्वर सोनोने, रूपेश जाधव आदींनी सक्रिय सहभाग नोंदविला.