breaking-newsपिंपरी / चिंचवड

वजनदार सोने चोरणारी टोळी गजाआड

16 लाखांचे सोने जप्त; आठ गुन्हे उघड

पिंपरी – वजनदार सोने परिधान करणा-या महिलांचा शोध घ्यायचा. त्या महिलेची माहिती काढायची आणि तिच्या गळ्यातील सोने चोरायचे. पिंपरी-चिंचवड परिसरात सोने चोरून मध्य प्रदेशात जाऊन दबा धरणा-या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 16 लाख 33 हजार रुपये किमतीचे 401 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यामुळे सात पोलीस ठाण्यातील आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

विजय उर्फ छल्या गोपीनाथ चव्हाण (वय 48, रा. अशोकनगर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर), गोविंद लाडू काळे (वय 28), शिवा किसन पवार (वय 27, दोघे रा. मु. पो. परतूर, जि. जालना) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांचे साथीदार सोमनाथ चोबे आणि सुनील पवार अद्याप फरार आहेत.

पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिमंडळ तीनमध्ये वाढत्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी वाकड पोलिस ठाण्याचे एक पथक तपास करत होते. पोलिस उपनिरीक्षक हरिश माने यांना माहिती मिळाली की, सोनसाखळी चोरी करणारा सराईत गुन्हेगार सोमनाथ चोबेचा साथीदार विजय पिंपरी-चिंचवड परिसरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे करून त्याच्या साथीदारांसह मध्य प्रदेश मध्ये रायसेन जिल्ह्यातील सांची तालुक्यातील गुलगाव येथे जाऊन राहत आहे. वाकड पोलिसांनी तात्काळ विजय, गोविंद आणि शिवा यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली असल्याची  माहिती मिळवली.

मध्य प्रदेश मधील नहार दरवाजा पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या तिन आरोपींना वाकड पोलिसांनी एका सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात वर्ग करून आणले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, सोमनाथ चोबे आणि सुनील पवार यांच्यासह विजय श्रीरामपूर येथून चारचाकी वाहनातून येऊन पिंपरी-चिंचवड परिसरात जास्त सोने घातलेल्या महिलांची टेहळणी करत. त्यानंतर त्या महिलेचे सोने चोरत असत.

यामुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन, वाकड, सांगवी, निगडी, पिंपरी, चतुःशृंगी, भोसरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून एकूण 401 ग्रॅम वजनाचे 16 लाख 33 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. विजय हा आरोपी अहमदनगर, पुणे ग्रामीण, गोवा, तामिळनाडू, मध्यप्रदेश मधील वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील फरार आरोपी आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सह आयुक्त रवींद्र कदम, उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस हवालदार विवेकानंद सपकाळे, जावेद पठाण, प्रमोद कदम, शाम बाबा, नितीन गेंगजे, दादा पवार, धनराज किरनाळे, सुरेश भोसले, अशोक दुधावणे, हनुमंत राजगे, बिभीषण कन्हेरकर, बापू धुमाळ, रमेश गायकवाड, विक्रांत गायकवाड, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, अनिल महाजन, महम्मद नदाफ, राजेंद्र बारशिंगे, भैरोबा यादव, सागर सूर्यवंशी, मधुकर चव्हाण, सनी गोंधळे यांच्या पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button