breaking-newsपिंपरी / चिंचवड

वंचित बहूजन आघाडी लोकसभेचा सर्व जागा लढविणार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – सत्ता संपादनासाठी वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूकीत राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहे. अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनावणे यांनी पिंपरीतील पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, महिला शहराध्यक्षा लता रोकडे, अनिल जाधव, डॉ. संजय सोनेकर, अरुण चाबुकस्वार, शहर प्रवक्ते के. डी. वाघमारे, शहर महासचिव सुहास देशमुख आदी उपस्थित होते. 
सोनावणे म्हणाले की, राज्यात 1972 साली पडला होता तेवढा दुष्काळ या वर्षी आहे. राज्यात अकरा हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या असताना ग्रामिण भागाला निधी देण्याऐवजी मेट्रो सिटींवर या बजेटमध्ये जास्त तरतूद करण्यात आली आहे. सरकारच्या अहवालाप्रमाणे मागील वर्षी नोटाबंदीमुळे पंच्चेचाळीस टक्के रोजगार घटला आहे. ‘ बहुजन सारे एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ; आता भिक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची’  दिल्ली विधानसभेत ज्याप्रमाणे सत्ता परिवर्तन झाले त्याप्रमाणे आलटून पालटून सत्ता उपभोगणारे भाजप सेना, कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना दुर ठेवून तिस-या वंचित बहुजन आघाडीला सत्ता देण्याचा निर्धार जनतेने केला आहे असे सोनोने यांनी सांगितले.
शहराध्यक्ष देवेंद्र तायडे म्हणाले की, सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाला कंटाळून हजारो शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्यांची लाट उद्योग नगरी पिंपरी चिंचवडला देखील आल्याचे दिसत आहे. हिंदूस्थान अँन्टीबोयोटिक्स कंपनीतील कामगारांना मागील वीस महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. या आर्थिक विवंचनेतून शुक्रवारी रामदास उकीरडे या कामगाराने आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एच.ए.च्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा अन्यथा भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी तायडे यांनी दिला.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button