breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘वंचित बहुजन आघाडी’ चे सोमवारी पिंपरीत महाअधिवेशन – देवेंद्र तायडे 

पिंपरी (महा ई न्यूज) – जातीयवादी भाजपा सेना सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी, वंचित बहुजनांच्या हाती सत्तेची चावी देण्यासाठी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाव्दारे बहुजनांना दिलेले अधिकार मिळवून देण्यासाठी आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ‘वंचित बहुजन आघाडी’ एकत्र आली आहे. 
जनजागृती करण्यासाठी मा. ॲड. आंबेडकर साहेब आणि मा. बॅ. खा. असदुद्दीन ओेवेसी यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. त्या अंतर्गत सोमवारी (दि. 28 जानेवारी 2019) दुपारी 3 वाजता पिंपरी नेहरुनगर येथील एच. ए. ग्राऊंड येथे भव्य सभा व महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला मा. ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, मा. बॅ. खा. असदुद्दीन ओवेसी, आमदार इम्तियाज जलील, पद्मश्री माजी आमदार लक्ष्मण माने, आमदार बळीराम शिरसकर, माजी आमदार विजय मोरे, माजी आमदार हरिदास भदे, भटक्या विमुक्तांचे नेते प्रा. किसन चव्हाण, ॲड. अरुण जाधव, भारीपचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनोने, माळी समाज नेते शंकर लिंगे, होलार समाजाचे नेते नाथन केंगार, लिंगायत समाज नेते शिवानंद हैबतपुरे महाराज, धनगर समाज नेते नवनाथ पडळकर, मातंग समाज नेते गणपत भिसे व सचिन बगाडे आदी उपस्थित राहणार आहे.
या सभेला राज्यभरातून विशेषता पश्चिम महाराष्टातून 2 लाख जनसमुदाय जमणार आहे. त्या दृष्टीने पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यात शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी बैठका सुरु आहेत. प्रचार पत्रके, हॅण्डबील, सोशल मिडीया, बॅनर, होर्डीग्जच्या माध्यमातून प्रचार, प्रसार सुरु आहे. या सभेच्या आयोजनात शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, यांच्या समवेत अकिबभाई मुजावर, नाथन केंगार, सुरेश गायकवाड, रहिम सय्यद, सुहास देशमुख, लताताई रोकडे, भिमाताई तुळवे, सुनिता शिंदे, अमीर खान, उत्तम मोर्वेकर आदींसह संयोजन समितीच्या शेकडो सभासदांनी सहभाग घेतला आहे.
‘वंचित बहुजन आघाडी’ मध्ये भारिप बहुजन महासंघ, एम्‌. आय. एम्‌., बरोबरच धनगर समाज, माळी समाज, मातंग समाज, लिंगायत समाज, होलार समाज, भटका विमुक्त समाज, बंजारा समाज आदी समाजांसह अनेक समाज संघटना, संस्था कार्यरत आहेत. आगामी निवडणुकीत मा. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील वंचित बहुजन समाज सत्ता परिवर्तन घडवेल असा विश्वास भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी बुधवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी अकीब मुजावर, नाथन केंगार, सुरेश गायकवाड, रहीम सैय्यद, सचिन तराळे आदी उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button