breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
लोणावळा घाटात पुन्हा दरड कोसळली, लोहमार्ग वाहतूक विस्कळीत
पिंपरी, (महाईन्यूज) – खंडाळा घाटात पुणे-मुंबई लोहमार्गावर पुन्हा दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आज सायंकाळी मुंबईहून सुटणारी आणि उद्या रविवारी (दि. 28) पुण्यातून सकाळी सुटणारी डेक्कन क्वीन रद्द करण्यात आली आहे.
लोणावळा घाट परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. आज दुपारी रेल्वे मार्गावर पुन्हा मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. त्यामुळे लोहमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरड कोसळत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील जवळपास वीस गाड्या रद्द केल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाची टीम मंकीहिल परिसरात पोहोचली होती. पावसाचा जोर कमी होत नसल्याने तसेच डोंगरावरून सतत माती खाली येत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल आहे.