Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
लोकसभा निवडणुकीसाठी प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी लागणार कामाला
![Pimpri Chinchwad Navnagar Development Authority merger notification issued!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/PCNTDA.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा निवडणुकीचे कामकाज पाहण्यासाठी निवडणूक आयोगाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील अधिकारी आणि कर्मचा-यांची माहिती मागविली आहे. निवडणूक कामकाजासाठी जिल्हा प्रशासनाला 65 हजार कर्मचा-यांची उपलब्धता अपेक्षीत आहे.
- निवडणुकीचे कामकाज पाहण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना कामकाजाचे वाटप केले जाते. मावळ आणि शिरुर या दोन्ही लोकसभा मतदार संघात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश आहे. लोकसभा निवडणूक व त्या पाठोपाठ विधानसभा निवडणूक होणार आहे. जिल्हा प्रशासनाला 65 हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेसह प्राधिकरण प्रशासनाकडे आवश्यक कर्मचारी पूर्तता करण्याची मागणी केली आहे.
प्राधिकरणाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासकीय) आशाराणी पाटील यांनी प्राधिकरणाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची यादी काढली आहे. त्यानुसार प्राधिकरणाची सुमारे 77 जणांची यादी जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आली आहे. दरम्यान, प्राधिकरणाकडून सध्या परिसराचे विकास करण्याचे व गृहप्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे. त्यात जिल्हा प्रशासनाकडून त्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम लागल्यास त्याचा पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या प्रशासकीय कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.