breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकसभा निवडणुकीसाठी केंद्र अध्यक्ष आणि पथकाला ‘VVPAT’चे प्रशिक्षण

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये VVPAT यंत्राचा वापर होणार असल्याने त्याची माहिती व्हावी, यासाठी केंद्र अध्यक्ष व त्यांच्या पथकाला प्रशिक्षण देण्यात येत आहे.

मावळ लोकसभा मतदार संघांतर्गत २०६ पिपरी विधानसभा मतदार संघातर्फे चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी, १,२,३ आणि इतर मतदान अधिकारी यांना पहिले प्रशिक्षण रविवारी (दि. २४) सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत देण्यात आले. प्रशिक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी नेमणूक केलेल्या सुमारे २ हजार मतदान अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते, अशी माहिती क्षेत्रीय अधिकारी विजय भोजने यांनी दिली.

यावेळी चंद्रकांत इंदलकर यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून सादरीकरण केले. सहा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी- उंटवाल यांनी विशेष मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे निवारण केले. याकामी अतिरिक्त सहा निवडणूक अधिकारी दिपक वजाळे यांनी उत्तम नियोजन करून ६ मास्टर्स ट्रेनर व ४५ क्षेत्रिय अधिकारी व सुमारे ५० इतर कर्मचारी यांची नेमणूक केली होती. प्रमोद ओंभासे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

निगडी प्राधिकरणातील डॉ. हेडगेवार भवन सेक्टर २६, सहा निवडणूक निर्णय  अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये दररोज दुपारी बारा ते चार यावेळेत ईव्हीम मशिन ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती वैशाली इंदाणी –उंटवाल यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button