breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लॉकिंग सिस्टम कंपनीच्या जाचातून मुक्त होण्यासाठी कामगारांचे मंत्र्यांना साकडे

  • कामगारांच्या हक्कांसाठी संभाजी ब्रिगेड मैदानात

पिंपरी – जगप्रसिद्ध युरोपा लॉक बनविणा-या वेलमेड लॉकिंग सिस्टिम प्रा. लि. या कंपनीमध्ये मागच्या बारा वर्षापासून तुटपुंज्या पगारामध्ये काम करत असलेल्या शेकडो कामगारांची व्यवस्थापन वर्षानुवर्ष पिळवणूक करत आहे. कामगारांना न्याय मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासमोर गुरूवारी (दि. 20) कैफीयत मांडली.

 

व्यवस्थापनाच्या या छळाला कंटाळून कामगारांनी आपल्या हक्कासाठी युनियनची स्थापना केली. व्यवस्थापनाच्या विरोधात कामगारांनी न्यायालयात दाद मागितली आहे. यामुळे चिडलेल्या व्यवस्थापनाने कोणतेही कारण नसताना अचानक युनियनच्या काही कामगारांना कामावरून काढून टाकले आहे.

 

या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी कामगारांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार यांची भेट घेउन हा प्रकार त्यांना सांगितला. अभिमन्यु पवार यानी त्यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. तातडीने महाराष्ट्राचे कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची भेट घेउन त्यांना कामगारांवर होत असलेला अन्याय सांगितला. या विषयात मंत्री महोदय यांनी तात्काळ संबंधित अधिकारी यांना बोलावून घेउन हा विषय लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रविण कदम यांना दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button