breaking-newsपिंपरी / चिंचवड
लांडेवाडीत विवाहितेचा विनयभंग करणाऱ्याविरोधात गुन्हा
![लोणावळ्यात धारदार शस्त्राने तरुणाचा खून](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/crime-washim-25_20180589874.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – एका ३२ वर्षीय विवाहितेचा पाठलाग करून तिच्या शरीराला स्पर्श करून विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार लांडेवाडीत शुक्रवारी (दि.११) घडला. या प्रकरणी जनक नागेश्वर सिंह (वय. ४५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३२ वर्षीय महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जनक पीडित महिलेला जुलै २०१८ पासून सतत त्रास देत आहे. शुक्रवारी (दि.११) त्यांने महिलेचा पाठलाग करून तिच्याविषयी अश्लील शब्द वापरले. त्याचबरोबर तिच्या शरीराला स्पर्श करून विनयभंग केला. अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.