breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रोहित पवारांनी भरला उमेदवारी अर्ज

कर्जत – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी गुरुवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा हा मतदार संघ आहे. त्यामुळे रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये लढत होणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रोहित पवार यांनी पदयात्रा काढत शक्तिप्रदर्शन केले. अर्ज भरण्यापूर्वी रोहित पवार यांनी कर्जतचे ग्रामदैवत गोधड महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर अक्काबाई मंदिर ते कर्जत तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढत त्यांनी अर्ज दाखल केला. या पदयात्रेत मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर, गेल्या वर्षभरापासून रोहित पवार या मतदार संघामध्ये काम करत आहे. मतदार संघातील जनतेंच्या भेटीगाठी घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button