रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने 50 डॉक्टर्स योध्यांचा सन्मान
- ‘डॉक्टर्स डे’ आणि ‘सीए डे’ केला साजरा
- डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय आणि ‘वायसीएम’च्या डॉक्टरांचा समावेश
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ आणि ‘सीए डे’ अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी कोविड 19, कोरोना विषाणुचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना उपचार पुरवत असलेल्या डॉक्टर्सना ‘दि ग्रेट वॉरियर्स’ असे सन्मानपत्र देऊन प्रोत्साहन देण्यात आले. रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनने 50 डॉक्टर्स आणि सिए यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष रोटरियन सारंग माताडे यांच्या सूचनेनंतर डॉक्टर्सना कोरोना योध्दा हे प्रमाणपत्र देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, सध्या कोरोनासारख्या महामारीसोबत लढत असताना आम्ही पीपीई किटचा वापर करत असुनही अनेक डॉक्टर्स व सहकारी कर्मचा-यांना या भयंकर विषाणुचा संसर्ग होत आहे. जर, तुम्ही साध्या मास्कचा वापर करून आमच्या संपर्कात आले, तर या विषाणुचा धोका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तुम्ही आमच्या संपर्कात येण्याची रिस्क घेऊ नका, असे डॉक्टर्सनी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनला कळविले. त्यानंतर अध्यक्ष रोटरियन सारंग माताडे यांनी सर्वानुमते ई-मेलद्वारे त्यांचे प्रमाणपत्र पाठविण्याचा निर्णय घेतला.
डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील अशा एकूण 50 डॉक्टर्सना ई-मेलद्वारे प्रमाणपत्र पाठवून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, 10 स्वयंसेवी योध्यांना सुध्दा सन्मानित करण्यात आले. क्लबचे चार्टर प्रेसिडेंट डॉ. रोटरियन गुरूबक्ष मातनाणी, डॉ. रोटरियन राजेंद्र भोसले यांच्यासह अन्य रोटरियन्स टिममध्ये सहभागी होते. तसेच, डॉक्टर्स डे निमित्त रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या पुढच्या पिढीतील सदस्यांना देखील प्रोत्साहन देण्यात आले. त्याचबरोबर ‘सीए डे’ निमित्त क्लबचे सदस्य व ‘आरसीपीटी’ आणि ‘आयसीए’च्या ‘सीए’ पथकाचे सचिव सीए रोटरियन संतोष जाधव यांचा सन्मान करण्यात आला.
हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रोटरियन वर्षा पांगरे, रोटरियन संतोष भालेकर, रोटरियन आनंद सुर्यवंशी, रोटरियन चिंतामणी अभ्यंकर आणि रोटरियन संतोष जाधव यांनी परिश्रम घेतले. याबद्दल रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सारंग माताडे आणि संचालक आनंद सुर्यवंशी यांनी सर्वांचे आभार मानले.