breaking-newsपिंपरी / चिंचवड

रेशन दुकानदारांना संरक्षण द्या, माजी खासदार गजानन बाबर यांची मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

सहसचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालय यांनी दिलेल्या राज्यातील रेशनिंग दुकानदारांना संरक्षण देण्याबाबतच्या आदेशाचे पालन होत नसल्याची खंत माजी खासदार गजानन बाबर यांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात बाबर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपरोक्त विषयास अनुसरून ऑल महाराष्ट्र रेशनिंग शोप कीपर फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष या नात्याने मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, प्रधान सचिव संजय खंदारे तसेच सहसचिव चारुशीला तांबेकर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना निवेदन दिले होते.

रेशनिंग दुकानदारांना स्थानिक राजकीय हस्तक्षेपाचा गुंडगिरीचा तसेच मारहाणीचा प्रकार मावळ, नाशिक, पिंपरी चिंचवड, चेंबूर, मुंबईतील काही ठिकाणे, रायगड, त्र्यंबकेश्वर येथे घडल्याचे निदर्शनात आणून दिले होते. तसेच असा प्रकार परत घडू नये रेशनिंग दुकानदार हे कोरोना साथीच्या प्रादुर्भावात सुद्धा नागरिकांना सेवा देण्याचे काम करीत असतात असे काम करीत असताना स्थानिकांची नागरिकांची  अरेरावी, दमदाटी तसेच राजकीय हस्तक्षेप यांना त्यांना सामोरे जावे लागते. दुकानदारांना मारहाण होते. तसेच काहीवेळेस कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी कार्यवाही होते, अशामुळे रेशनिंग दुकानदारांचे खच्चीकरण होत आहे, अशामुळे दुकानदार भयभीत होतात व रेशनिंग दुकानदारामध्ये हे भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण होते, असे बाबर यांनी म्हटले आहे.

माल वाहतूक करण्यासाठी कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे हमाल मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीतही स्वस्त धान्य दुकानदार अविरत कार्यरत असून अन्नधान्य वाटपाचे काम करीत आहेत. तसेच माझे ऑल महाराष्ट्र रेशनिंग शोप कीपर फेडरेशनच्या वतीने आपणास विनंती आहे की अशा परिस्थितीत रास्त भाव दुकानदार विरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांची सहानुभूतीपूर्वक दखल घेऊन तक्रारीची शहानिशा करून उचित कार्यवाही करावी तसेच आवश्यकतेनुसार संबंधित रास्त भाव दुकानदारांवर गुंड किंवा समाजकंटकांकडून मारहाण होऊ नये, म्हणून त्यांना उचित संरक्षण देण्याचे आपल्या मार्फत दक्षता, व्यवस्था करावी.

आमच्या तक्रारीची दखल घेऊन सहसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सर्व जिल्हा पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य यांना राज्यातील रेशनिंग दुकानदारांना संरक्षण देण्याची सूचना दिनांक 27 एप्रिल 2020 च्या परिपत्रकानुसार केली आहे.

ऑल महाराष्ट्र रेशनिंग शोपकीपर फेडरेशन च्या वतीने व अध्यक्ष या नात्याने आमची राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व जिल्हा अधीक्षक यांना विनंती आहे की आपण रेशनिंग दुकानदारांना संरक्षण द्यावे, जेणेकरून वितरण व्यवस्था व्यवस्थित रित्या होईल व रेशनिंग दुकानदार निर्भयपणे वितरण करू शकतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button