breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रेड झोन बाधित रहिवाशांच्या सुविधा होणार खंडीत, आयुक्तांचे आदेश

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रेड झोन बाधित भूखंडावरील रहिवाशांना देण्यात येणा-या सोयी सुविधा महापालिकेकडून खंडीत करण्यात येणार आहेत. अशा भूखंडांची विक्री होणे नियमबाह्य असून रेड झोन बधित भागातील घरांना रस्ते, वीज, पाणी अशा कोणत्याच सुविधा दिल्या जाणार नाहीत. त्यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराचा काही भाग लष्कराच्या रेड झोन बाधीत भूखंडावर विस्तारलेला आहे. लष्कराकडून या भूखंडावर लोकवस्ती विस्थापीत होण्यासाठी निर्बंध घातले आहेत. तरी, रेड झोन बाधित भागातील भूखंडाची फोड करून विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या भागातील जमिनीवर घर अथवा कोणतेही बांधकाम करण्यास पालिकेची परवानगी मिळत नाही. त्यामुळे या भागात रहिवास करणे नियमबाह्य ठरते. अशा भूखंडाचा आर्थिक व्यवहार नागरिकांनी करू नये, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

भविष्यात रेड झोन बाधित भूखंडाची विक्री होत असताना सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. अशा भागातील घरांना पालिकेकडून कोणत्याही सुविधा दिल्या जाणार नाहीत. तसेच, सध्या रेड झोन बाधित भागातील रहिवाशांच्या सुविधा रोखण्यात येणार आहेत. यासंदर्भात आयुक्त हर्डीकर यांनी पालिकेच्या सर्वच विभागांना आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button