Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
रिक्षाचालक, कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/download-8.jpg)
पिंपरी – थेरगाव येथील आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल व रिक्षा पंचायत यांच्या वतीने रिक्षाचालक, त्यांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन गुरुवारी (दि 31) दुपारी बारा वाजता थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये होणार आहे. यावेळी बिर्ला हाॅस्पीटलचे सीईआे रेखा दुबे, रिक्षा पंचायतीचे बाबा कांबळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या शिबिरात सर्व चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. या शिबिरात भाग घेणाऱ्या रिक्षा चालक आणि त्यांच्या कुटूंबास अल्पदरात उपचार केले जाणार आहेत. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी सोमनाथ कलाटे 8888927826 व नदीम शेख 9028652424 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले आहे.