Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या तुकडीत प्रवेश मिळविल्याबद्दल महापालिकेतर्फे सत्कार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४१ व्या तुकडीमध्ये निगडी, प्राधिकरणातील साहिल विजय बरजे याने राष्ट्रीय पातळीवर क्रमांक प्राप्त करून प्रवेश मिळविल्याबद्दल त्यांचा स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सत्कार समारंभावेळी “ब”प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, “क”प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, नगरसदस्य विलास मडिगेरी, राजू मिसाळ, अमित गावडे, राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, विकास डोळस, नगरसदस्या गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, साधना मळेकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, नगरसचिव उल्हास जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.





