breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रीय विज्ञान दिनी पिंपरीतील डाॅ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात कार्यशाळा

– ‘सायन्स फॉर पिपल, पिपल फॉर सायन्स’ पिंपरीतील डाॅ.डी.वाय.पाटील महाविद्यालयात कार्यशाळा
पिंपरी ( महा ई न्यूज ) – राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पिंपरीतील डॉ. डी वाय पाटील जैवतंत्रज्ञान आणि जैव माहितीशास्त्र संस्थेत गुरुवारी (दि.28) विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
“सायन्स फॉर पिपल, पिपल फॉर सायन्स” या उपक्रमा अंतर्गत यावेळी ताथवडे, हिजवडी, आणि वाकड परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थांनी विविध प्रकारचे विज्ञान विषयक पोस्टर्स आणि मॉडेल्स यांची प्राक्यक्षिके सादर केली. तसेच या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयक वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात आगरकर संशोधक संस्थेचे संचालक डॉ. के.पकनीकर यांनी ‘विज्ञानाचे महत्व’ यावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.जे पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे परिसरातील विविध शास्त्रज्ञ आणि संस्थेच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवून परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचे महत्व व गोडी निर्माण केली. या उपक्रमाचे आयोजन डॉ. राजेश गुप्ता यांनी केले.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button