राष्ट्रवादी युवतींचा ‘एक दिवा उद्याच्या उमेदीचा’ उपक्रम गरजुंची दिवाळी प्रकाशमय करणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/IMG-20201101-WA0008.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने ”एक दिवा उद्याच्या उमेदीचा” या उपक्रमाचे आयोजन युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांच्या वतीने करण्यात आले.
ऐऑन इव्हेंट अॅण्ड हाॅस्पिटॅलिटी, युथ द पाॅवर टु चेंज व मदत प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून व सोनम पाटील यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून पणत्या रंगवून त्यावर सजावट करण्यात आली. या रंगबिरंगी सजावट केलेल्या पणत्या दिपावलीच्या मुहुर्तावर बाजारात विक्री केल्या जाणार आहेत. त्यातून जो निधी मिळणार आहे, तो गरिब, गरजू व बेघर कुटुंबातील मुलांसाठी सोनेरी दिवाळी साजरी करण्यासाठी खर्च केला जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी ऋतुजा बिराजदार, गीता मोरे, नेहा पडवळ, हीना अत्तार, मेघना जगताप, शलाका बनकर, स्नेहल लायगुडे, अश्विनी पवळ, सायली निकम, सारिका ढमे, फातिमा अन्सारी, रविराज काळे, राजश्री आहिरे यांचा सहभाग लाभला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती विरेंद्र बहल, पल्लवी पांढरे, मनिषा गटकळ यांची होती.