Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
		
	
	
राष्ट्रवादी पिंपरी-चिंचवड कामगार सेलची कार्यकारिणी जाहीर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) कामगार सेल अध्यक्ष पदी किरण चंद्रकांत देशमुख यांची २३ जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदेश कामगार सेल अध्यक्ष रामचंद्र खटकाळे यांच्या उपस्थित नियुक्ती केली.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. तसेच, त्यांना पदाची जबाबदारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामगार सेल पिंपरी-चिंचवड शहराची कार्यकारिणी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या उपस्थितीत आज रविवारी (दि. 16) जाहिर करण्यात आली.
यावेळी नगरसेवक राजू बनसोडे, मुख्य संघटक सचिव अरुण बोऱ्हाडे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
				
 
 
 
 
 
 




