Breaking-newsपिंपरी / चिंचवड
राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभागातर्फे शांताबाई पवार यांना मदत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/85d9ef85-fbad-4ad8-a605-9f611eab1de0.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
काठी फिरविण्याच्या कलेवर अख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणा-या पुण्यातील अजी शांताबाई पवार आता सर्वांच्या परिचयाच्या झाल्या आहेत. अनाथ मुलांच्या उपजीविकेसाठी लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर येऊन काठी फिरवतानाचा त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. प्रसारमाध्यमांनी याची दखल घेतल्यानंतर त्यांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभाग पुणेच्या जिल्हाध्यक्षा मीना मोहिते यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तुंची मदत केली. त्यांच्यासोबत पुणे जिल्हा कार्याध्यक्षा संध्या शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन गायकवाड, छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष शंकर जाधव, कार्याध्यक्ष प्रविण झांबरे, दीपोत्सव सोहळा समिती उपाध्यक्ष विश्वनाथ ढोरे, संघटक करण भोसले आदी यावेळी उपस्थित होते.