breaking-newsपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी असंघटीत कामगार संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षा मिना मोहिते यांच्या वतीने नागरिक आणि पोलिसांना जेवण, चहा-नाष्टा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादी असंघटीत कामगार संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षा मिना मोहिते यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख चौकात बंदोबस्त तैनात ठेवणा-या पोलिसांना आणि सर्वसामान्य नागरिकांना जेवण पुरवण्यात आले. चहा नाष्ट्याची सोय करण्यात आली.

गेली दीड महिना कुठलेही सरकारी मदत न घेता एक वेळ जेवण सर्वसामान्यांना देण्यात येत आहे. नितीन गायकवाड, राजेंद्र मोहिते, अभिषेक हांडे, राहुल राऊत, जयश्री प्रसाद, अरुण आवदुते, गायत्री आसवले आणि सलिम आतार यांनी सर्वानी मिना मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांना मदत करीत आहेत. सदैव आपल्या कार्याला तत्परता देणारे आपले पोलीस बांधव यांनासुद्धा रात्री फिरून चहापाण्याची व्यवस्था केली.

सर्वसामान्यांना व्हेज पुलाव व चहा वाटप केला. शगुन चौक, आंबेडकर चौक, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, सांगवी पोलीस स्टेशन, काळेवाडी ब्रिज, काळेवाडी फाटा, शिवार चौक, पाचपीर चौक या सर्व ठिकाणी जाऊन सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस बांधवांना जेवण, चहानाष्टा पुरवण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button