breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीकडून जय भगवान गोयल यांचा डांगे चौकात निषेध, भाजपविरोधात नारेबाजी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून समाजात असंतोष पसरत असताना दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे पुस्तक लिहिणारे जय भगवान गोयल यांचा निषेध केला. यावेळी भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेशी संबंधीत मुद्दे उपस्थित करून समाजात जाणिवपूर्वक तेढ निर्माण केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला.

राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी भाजपच्या विरोधात नारेबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

नाना काटे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणे योग्य नाही. कारण, उभ्या विश्वात छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य आणि कार्य अलौकीक आहे. महाराजांच्या नावाशी आपले नाव जोडून मोठेपणा मिळविण्याचा प्रयत्न कोणी करू नये. जर असा प्रयत्न करत असेल तर त्याचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, भाजपचे जय भगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केली आहे. हे अत्यंत चुकीचे आणि आक्षेपार्ह आहे. भाजपच्या नेत्यांनी असा प्रयत्न करून समाजात तेढ आणि वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा भाजपच्या नेत्यांना राज्यात फिरणे मुश्कील होईल. त्यावर हे पुस्तक तात्काळ मागे घ्यावे, अन्यथा राष्ट्रवादी यापेक्षा तिव्र आंदोलन करेल.

विशाल वाकडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराजांशी तुलना करणे अत्यंत निंदनिय आहे. हा भाजपने केलेला महापुराषांचा अपमान आहे. पंतप्रधान मोदींची महाराजांशी तुलना होऊच नकत नाही. त्यांचीच काय तर उभ्या जगातील कोणाशी तुलना होऊ शकनार नाही, एवढे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे.

महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांनी देखील मनोगत व्यक्त करून भाजपचा निषेध केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button