breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीकडून आयुक्त श्रावण हर्डीकर यांना जलपर्णी भेट

  • महापालिकेत आयुक्तांना घातला घेराव
  • पालिका ठेकेदारांना पोसत असल्याचा केला आरोप

पिंपरी – गेल्या कित्येक महिन्यांपासून नदीपात्रात वाढलेली जलपर्णी काढली नसल्यामुळे डासांचा उपद्रव सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासन निव्वळ ठेकेदारांना पोसण्याचा उद्योग करत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना घेराव घातला. यावेळी पदाधिका-यांनी आयुक्तांना जलपर्णी भेट देऊन प्रशासनाचा निषेध केला.

शहरातून वाहणा-या पवना आणि इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी पालिकेने ठेकेदाराची नेमणूक केली आहे. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून ठेकेदाराने जलपर्णी काढलेली नाही. याबाबत तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त श्रावण हर्डीकर यांची गुरूवारी (दि. 14) भेट घेतली.

संजोग वाघेरे म्हणाले की, पवना नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम ज्या ठेकेदाराला दिले. तो ठेकेदार काम करत नाही. त्यामुळे जपपर्णीची वाढ झाली आहे. नदीपात्रालगतच्या नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिका केवळ ठेकेदारांना पोसण्याचा उद्योग करते काय?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दत्ता साने म्हणाले की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी जलपर्णी काढणे, नाल्यांची सफाई ही कामे झाली पाहिजेत. आता पावसाळा सुरू झाल्यात जमा आहे. तरीसुध्दा जलपर्णी शंभर टक्के काढलेली नाही. जलपर्णी काढण्यासाठी ठेकेदाराला 40 लाख रुपये दिले आहेत. तर, ठेकेदाराने 40 लाखाचे कोणते काम केले. याचा आढावा तुम्ही घेतला आहे. दापोडी, कासारवाडी भागातील नदीपात्रात अजुनही जलपर्णी काढलेली नाही. त्यामुळे अधिका-यांचे ठेकेदारांवर नियंत्रण नाही, असा आरोप त्यांनी केला.

शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेविका वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, माई काटे, प्रज्ञा खानोलकर, नगरसेवक राजू बनसोडे, श्याम लांडे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button