breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रावेत येथे पवना नदी पात्रात महिलेचा मृतदेह

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – रावेत येथील पवना नदी पात्रात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज गुरूवारी (दि. 17) सकाळी साडेआठच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला आहे.

मंगला अशोक शिंदे (वय 55, रा. धर्मराज मंदिराजवळ, रावेत) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला शिंदे मागील आठवड्यापासून आजारी होत्या. आजारपणात त्या नैराश्यात होत्या. मागील तीन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. घरातील मंडळींनी नातेवाईक, मित्र आणि ओळखीच्या लोकांकडे त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा तपास लागला नाही. आज सकाळी त्यांचा मृतदेह रावेत येथे संत तुकाराम महाराज उड्डाण पुलाजवळ पवना नदी पात्रात आढळून आला.

मंगला यांचा मृत्यू मागील दोन ते तीन दिवसांपूर्वीच झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी वाकड पोलिसांना पाण्यात मृतदेह असल्याची माहिती दिली. वाकड पोलिसांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button