राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शहर मनसेतर्फे रुग्णांना फळवाटप
पिंपरी, (महाईन्यूज) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड मनसेच्या वतीने यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रुग्णांना शुक्रवारी (दि. 14) फळे आणि बिस्कीट वाटप करण्यात आले. शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला.
राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दुर्बलतेमुळे एकीकडे शेतक-यांची ससेहोलपट होत असतानाच दुसरीकडे वाढदिवस असेल अथवा खासगी कार्यक्रम यावर वारेमाप पैशांची उधळपट्टी केली जाते. हे मनाला पटत नसल्याने ठाकरे यांनीच राज्यातील पक्षाच्या संबंध पदाधिका-यांना वाढदिवसावर होणारा खर्च टाळून समाजसेवा करण्याची सूचना केली होती.
त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहर मनसेचे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गटनेते सचिन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पदाधिका-यांनी पिंपरीतील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे वाटप केली. बिस्कीटचे पुडे देण्यात आले. हा उपक्रम अनोखा ठरल्याने सर्वत्र याचे कौतुक होत आहे.