breaking-newsपिंपरी / चिंचवड

राज्य सरकारच्या विरोधात रिक्षाचालकांची बोंबाबोंब आंदोलनाची तयारी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

रिक्षाचालकांच्या मागण्यांसाठी कित्येकवेळा निवेदने देऊनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने रिक्षाचालकांचा संताप अनावर झाला आहे. आता कोणत्याही प्रकारची वाट न पाहता बोंबाबोंब आंदोलन करण्यासाठी रिक्षाचालक रस्त्यावर उतरण्याची भूमिका महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सर्व रिक्षाचालक-मालकांच्या संम्मतीने घेतला आहे.

गेली सात महिने रिक्षा व्यवसाय बंद आहे. रिक्षा चालक अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. आर्थिक व्यवस्थेला कंटाळून महाराष्ट्रात आठ रिक्षाचालकांनी आत्महत्या केली आहेत. उद्योगपतीसह सर्वांना 20 लाख कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात आले. परंतु, रिक्षाचालकांना मदत मात्र केली नाही. दिल्ली आणि कर्नाटक सरकारने रिक्षाचालकांना आर्थिक मदत केली. परंतु, महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत रिक्षाचालकांना मदत केली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांचा संताप आता अनावर झाला आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवडमधील सर्व रिक्षा स्थानकावर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा निर्णय बाबा कांबळे यांनी आज बैठकीत घेतला आहे.

यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डबाळे, बाळासाहेब ढवळे, संजय गरड, संजय कदम, मनोहर टोणपे, संदीप सांगावे, प्रदीप सांगवे, संतोष धुमाळ, मुकेश कुचेकर, भूषण गायकवाड, आनंद गायकवाड, लक्ष्मण जगधने, विलास जोगदंड, लक्ष्मण घोडके, विजय ढगारे, तुषार लोंढे, बाबासाहेब सरोदे, संजय गजरे, संजय दौंड, असेर वस्ताद, तय्यब आत्तर, विशाल कांबळे, राहुल कांबळेे, आकाश परदेशी, अनिल जेऊरकर, दत्ता उलटे, आनंद गायकवाड, अंगद मुगले, संतोष पवार, गालिब तांबोळी, अनिल नंदेपगोळ, विलास उमाप, संतोष पवार, धनंजय कुदळे, सागर पवळे, निलेश वाघुले, संतोष मस्के आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button