‘राज्यात जिम, व्यायामशाळा सुरु कराव्यात’; आ. महेश लांडगे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/1Uddav_20Thakre_20_20Mauli_20Katke_20_20Mahesh_20Landge.jpg)
पिंपरी | देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनलॉक-3 जाहीर केला आहे. यासाठी सरकाच्या वतीने नवीन नियमावलीही जारी करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने जारी केल्या या नियमावली प्रमाणे 5 ऑगस्टपासून जिम खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत ऑगस्ट महिन्यात काही शिथिलता दिली आहे. मात्र, जिम आणि व्यायामशाळा सुरु करण्यास अद्याप तरी राज्य सरकारने म्हणजेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकासआघाडीतील एकही पक्षाने अद्यापही जिम आणि व्यायामशाळा सुरु करण्यास कोणतेही आदेश किंवा परवानगी दिलेली नाही.
याच पार्श्वभूमीवर फिटनेस व्यवसायातील जिम ट्रेनर आणि जिम मेंबर यांनी ५ ऑगस्ट पासून जिम आणि व्यायामशाळा सुरु करण्याची परवानगी यासाठी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरी मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांना आपली समस्या सांगितली.
पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरी मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांनी फिटनेस व्यवसायातील या कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी पुढाकार घेतला असून आमदार महेशदादा लांडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यात जिम आणि व्यायामशाळा सुरु करावेत. आणि या व्यवसायातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली आहे.
दरम्यान, फिटनेस व्यवसायातील जिम ट्रेनर आणि जिम मेंबर यांनी राज्य सरकारला ५ ऑगस्ट पासून जिम आणि व्यायामशाळा सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे तसेच जर याबाबद्दलचे आदेश २ ऑगस्ट पर्यंत मिळाले नाही तर महविकास आघाडी मधील एकही पक्षाला येत्या निवडणुकीत फिटनेस व्यवसायातील कर्मचाऱ्यांकडून एकही मत मिळणार नाही असा निर्धार या कर्मचाऱ्यांनी केला आहे.