राजीव गांधी जयंतीनिमित्त युवक काँग्रेसचा पर्यावरण संवर्धन उपक्रम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/unnamed-6.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भारतीय संगणक क्रांतीचे जनक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे निर्माते स्व. पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त (सद्भावना दिन) पिंपरी चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षवाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या अंतर्गत पिंपरी येथील एच ए मैदानाजवळील परिसरात २५ वृक्षांचे रोपण करण्यात आले व परिसरातील सोसयटी मधील रहिवासियांना वृक्षवाटप करण्यात आले, त्याच प्रमाणे स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्य करणा-या संस्थांना वृक्ष रोपे वाटप करून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागरण करण्यात आले.
या प्रसंगी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय जैन, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, जिल्हा सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, मिलिंद बनसोडे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, भूषण भंडारी, जाकीर चौधरी व बालाजी डावरगावे आदि उपस्थित होते.