राजगृह हल्ला प्रकरण : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागातर्फे निषेध; कारवाईची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/1-11.jpg)
पिंपरी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वकष्टातून उभारलेले आंबेडकरी अनुयायांचे अस्मिता असणारे “राजगृह” या वास्तूवर मानसिक मनोविकृतीच्या समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
सदर दोषी असणाऱ्या व्यक्तीवर व त्या पाठीमागच्या मास्टरमाइंडचा – शोध घेऊन समाज विघातक प्रवृत्तींवर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागपिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने सदर निवेदन नायब तहसीलदार अंकुश आटोळे यांना देण्यात आले.
तहसील कार्यालय, आकुर्डी याठिकाणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय महिला शहराध्यक्षा गंगाताई धेंडे, शहर उपाध्यक्ष संदिपान झोंबाडे, कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, मुख्य सरचिटणीस अभिजीतदादा आल्हाट, उपाध्यक्ष योगेश आयवळे, विठ्ठल उर्फ नाना धेंडे, सरचिटणीस राजेंद्र शिंदे, पिंपरी विधानसभा संघटक माणिकराव खंडागळे, विशाल घोगरे, विजय कणसे आदी उपस्थित होते.