राजकारण गेलं खड्ड्यात, जन्मदात्या आईविषयी बोलाल तर याद राखा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Dane.jpg)
- महासभेत नगरसेवकांनी घातला तांडव
- भरसभेत नैतिकतेची झाली पायमल्ली
पिंपरी, (महाईन्यूज) – अहिल्यादेवळी होळकर जयंती महोत्सवावरून विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांच्यात आरोपप्रत्यारोप झाले होते. त्याचे पडसाद आज महासभेत जोरदारपणे उमटले. बोलण्याच्या ओघात आशा शेंडगे यांनी दत्ता साने यांच्या व्यक्तीगत विषयाला हात घातल्यामुळे दत्ता काका चांगलेच भडकले. राजकारण गेलं खड्ड्यात, जन्मदात्या आईला उद्देशून बोलाल तर याद राखा, अशा शब्दांत काकांनी सभागृहाला सुनावले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव साजरा केला जातो. दरम्यान, नगरसेविका शेंडगे यांच्या पुरस्कृत धनगर समाजाच्या संघटनेने आयुक्तांशी जयंती महोत्सवाबाबत संपर्क साधून सूचना केली होती. त्यावर भाजपचे माजी नगरसेवक राजू दुर्गे, विणा सोनवलकर आणि त्यांच्या सहका-यांनी विरोधी पक्षनेते या नात्याने दत्ता साने यांना शेंडगे यांच्याबाबत निवेदन दिले होते. ते निवेदन साने यांनी रितसर पध्दतीने आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्यापुढे मांडले. त्यावर दत्ता साने यांचा अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाला विरोध नसताना तो असल्याचा कांगावा करण्यात आला. त्याचे पडसाद आज महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत संतापजनक वातावरणात उमटले.
या विषयावर बोलण्याच्या ओघात शेंडगे यांच्याकडून साने यांच्या व्यक्तीगत विषयावर आक्षेपार्ह भाष्य झाले. त्यामुळे दत्ता काकांना सभागृहातच संताप चढला. माझ्या व्यक्तीगत मुद्याला हात घालायचे कारण नाही. माझे वडिल पूर्वीच आनंतात विलीन झाले आहे. माझ्या आईला मी काळजीपूर्वक सांभाळतोय. राजकीय कामकाजावर बोलताना माझ्या आईविषयी बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे बोलताना तोल सांबाळून बोला. यापुढे जन्मदात्या आईविषयी बोलाल तर याद राखा, अशा शब्दांत साने यांनी शेंडगे यांना इशारा दिला.